SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्प

जाहिरात

 

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजन

schedule17 Oct 26 person by visibility 46 categoryराज्य

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर आणि उप जिल्हा वसाहत रुग्णालय, गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू जन्य पदार्थ सेवन चे दुष्परिणाम व मुख आरोग्याबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे हा या उद्देशाने नागरिकांसाठी “लक्षीत गट चर्चा” 'फोकस ग्रुप डिस्कशन' (Focus Group Discussion) च्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दंतशल्य चिकित्सक डॉ. तेजस्वी पवार यांनी उपस्थितांना मुख आरोग्याचे महत्त्व (Oral Health) सांगून याविषयी सविस्तर जनजागृतीपर माहिती दिली.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी तंबाखू सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे कॅन्सर गंभीर दुष्परिणाम स्पष्ट केले. तसेच, अप्रत्यक्ष धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग - Passive Smoking) आणि त्याचा गरोदर महिलांवर व होणाऱ्या बाळावर होणारा घातक परिणाम यावर विशेष प्रकाश टाकला. 

याशिवाय दातांची व मुखाची निगा राखण्यासाठी योग्य पद्धतीने ब्रशिंग करणे आणि वेळोवेळी 'स्व-मुख तपासणी' (Self-Oral Examination) कशी करावी, याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन त्यांनी नागरिकांना दिले.

 "आपण स्वत: तंबाखू व्यसनांपासून दूर राहून आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवारालाही या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत," असे आवाहन डॉ. आरळेकर यांनी या प्रसंगी केले.

या जनजागृतीपर उपक्रमास डॉ. महेंद्र फाळके, श्रीम.मंगल चव्हाण, श्रीम रत्नाकर, श्रीम. क्लारा चोपडे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची टीम, रुग्णालयातील इतर सर्व स्टाफ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes