SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन राज्यस्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धेत मेन राजाराम अजिंक्य सुवर्णपदक पटकावलेकोरे अभियांत्रिकीच्या १६ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवडसैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रमनैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिवाजी विद्यापीठात एनर्जी स्वराज यात्रेचे स्वागतमोडी लिपी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढरब्बी हंगाम 2024 पीकस्पर्धा निकाल जाहीरकोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाईसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य

जाहिरात

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली सदिच्छा भेट; कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांबाबत वेधले लक्ष

schedule08 Apr 23 person by visibility 3216 categoryराजकीय

नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणून सर्वोत्तम योगदान देण्याचे अभिवचन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदार धनंजय महाडिक यांना शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

 यावेळी खासदार महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक, सुपुत्र चिरंजीव पृथ्वीराज, विश्वराज, कृष्णराज तसेच स्नुषा वैष्णवी आणि नातू चिरंजीव अमरेंद्र असे संपूर्ण महाडिक कुटुंबीय उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या परिवारातील सदस्यांची सुद्धा आत्मीयतेने आणि आपुलकीने चौकशी करून संवाद साधला.

 दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले. ज्यामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांबाबत लक्ष वेधले. कोल्हापूर शहरातून रत्नागिरीला जाणारा महामार्ग जातो. त्यामुळे कोल्हापूर शहरात सुमारे सात किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारावा, तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर शहराबाहेरून सुमारे ६५ किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड तयार करावा, या दोन्ही कामांची जबाबदारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.

 तसेच सातारा, पंढरपूर, करुळ, कामटी हा सोलापूर जिल्ह्यातील रस्ता, पर्यटक आणि भाविक यांच्यासाठी महत्वाचा आहे. महाबळेश्वर, पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. शिवाय १५ साखर कारखान्यांच्या वाहनांची याच रस्त्यावरून वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा, आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. या दोन्ही मागण्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मकता दर्शवली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes