SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैवविविधता टिकविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब आवश्यक : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुधीर कुंभारहितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल : चंद्रकांतदादा पाटीलकोरे अभियांत्रिकी स्थापत्य विभाग व आयएसएसइ यांच्यात सामंजस्य करारमहाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरजागतिक तंबाखू विरोधी दिन: निरोगी भविष्यासाठी एक संकल्पजयसिंगपूर शहरासाठीची सुधारित 70 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे : नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेऊ नयेनवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडेकोल्हापूर: गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा दणका; कणेरीवाडी व मोरेवाडीत मोठी कारवाई

जाहिरात

 

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

schedule30 Mar 26 person by visibility 369 categoryदेश

  दिल्ली : खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली.

  संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशा वेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द व्हावा, या मागणीचे निवेदन खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले. मुळात ट्रॉलीला कोणतेही इंजिन असत नाही.

  ट्रॅक्टरला जोडल्यानंतरच ट्रॉली किंवा ट्रेलरची वाहतुक होते. हायड्रोलिक यंत्रणा असलेले डंपींग ट्रेलरही ट्रॅक्टर मार्फतच ओढले जातात. सर्वच प्रकारच्या कृषी उत्पादनांची आणि त्यातही प्रामुख्याने ऊसाची वाहतुक करण्यासाठी या ट्रॉली किंवा ट्रेलरचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांसाठी ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुक महत्वाची असते. या ट्रॉलीवर जीएसटी आकारणी केल्याने कृषी उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होतो. सध्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ५ टक्के जीएसटी असून, हा करही केंद्र सरकारने रद्द करावा आणि शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्याला नामदार सितारमन यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes