SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जयसिंगपूर शहरासाठीची सुधारित 70 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे : नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेऊ नयेनवोन्मेष, मूल्यवर्धन आणि युवा शक्तीच्या बळावरच घडेल विकसित कृषी भारत : अशोक काकडेकोल्हापूर: गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा दणका; कणेरीवाडी व मोरेवाडीत मोठी कारवाईकोल्हापूर: राजारामपुरीतील जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्तमी अनेक वर्षे शेती करतोय परंतु; कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा चांगला ऊस आयुष्यात पाहिला नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन हिंदी पत्रकारिता दिन: लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरवशाली वारसापुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती; सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

जाहिरात

 

जयसिंगपूर शहरासाठीची सुधारित 70 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे : नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर

schedule30 May 26 person by visibility 95 categoryराज्य

जयसिंगपूर : अहोरात्र पाणीपुरवठा करण्याच्या संकल्पनेतून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून जयसिंगपूर शहरासाठी मंजूर 70 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली,


या योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहराच्या भागा -भागात पाणीसाठा करण्यासाठी चार नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार होत्या, यातील तीन टाक्या उभारण्याचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी काका ऑइल मिल परिसरात साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या चौथ्या टाकीच्या उभारणीचा पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला यावेळी ते बोलत होते, सदरची टाकी उभारण्यासाठी लागणारी जागा धवल देसाई यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी धवल देसाई आणि देसाई परिवाराचे आभार मानले.

 नव्याने उभारल्या जाणाऱ्या या टाकीमुळे गल्ली नंबर सहा राजीव गांधीनगर, जांभळे मळा व रेल्वे स्टेशन परिसराला योग्य दाबाने पाणीपुरवठा केला जाईल व याचा लाभ या परिसरातील नागरिकांना होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले, नवीन पाणी योजनेतील कामांपैकी जॅकवेल उभारणे, शहरांतर्गत वितरण व्यवस्था लाईन टाकने ही कामे पूर्ण झाली असून फिल्टर हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आहे काही दिवसातच या योजनेअंतर्गत असलेल्या सर्व कामांची पूर्तता होईल व शहराच्या सर्व भागात नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, नगरसेविका तेजश्री पाटील, स्वाती मादनाईक, मीनल नांद्रेकर, लता गाडेकर, तबसूम फरास, नगरसेवक बजरंग खामकर, लक्ष्मण गोसावी,अर्जुन देशमुख, अशोक मळगे, यांच्यासह माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, राहुल पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, सागर मादनाईक, सागर आडगाणे ए. ए. पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes