SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शनक्रांतीची पहिली ठिणगी: हुतात्मा दामोदर हरी चाफेकरसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णयकरवीर नगरीत खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

जाहिरात

 

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागर

schedule05 May 26 person by visibility 305 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेद्वारे शहरातील बोगस मतदान कायमचे हद्दपार करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. शिवसैनिकांनी प्रत्यक्ष ऑन फिल्ड काम करून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात आणि विरोधकांचे बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावावेत, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार यादीतील डेटाचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.

 कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांचे मॅपिंग होत नसल्याने तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर असल्यास किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे यादीत असल्यास ती वगळण्यासाठी बीएलओंकडे पाठपुरावा करावा. प्रत्येक मतदाराचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक असल्याची खात्री करावी. ज्या भागात संशयास्पद नोंदणी जास्त आहे, तिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.

यावेळी क्षीरसागर यांनी विरोधकांवर तोफ डागताना म्हटले की, जनतेचा आधार उरला नसल्यानेच विरोधक बोगस मतदानाचा आधार घेत गल्लीबोळात फिरत आहेत. या बैठकीस शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes