SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्वशाही दसरा महोत्सवाचा भाविक - नागरिकांनी आनंद घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडमनकर्णिका कुंडाचा ऐतिहासिक ठेवा भाविकांसाठी लवकर खुला करा; संवर्धनाच्या कामाला गती देण्याच्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनाहरोली येथील आरोग्य शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी'विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी' : निवृत्त मेजर रत्नाकर तिराळे यांचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार; लातूर, हिंगोलीतून ठिणगी पडणार. शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही

जाहिरात

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरण

schedule12 Oct 26 person by visibility 148 categoryराज्य

◼️जिल्ह्यात ८ हजार ३७९ वृक्षांची लागवड; श्रमदानात २७ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकूण १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ६१० ग्रामपंचायतींमध्ये ८ हजार ३७९ वृक्षांची लागवड करण्यात आली.

गावांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व १ हजार २६ ग्रामपंचायतींमध्ये श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतून सार्वजनिक स्वच्छता, परिसराचे सुशोभीकरण आणि सामाजिक कार्यातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमध्ये एकूण २७ हजार ५४८ नागरिकांनी सहभाग नोंदविला. शासकीय दाखल्यांचे वितरण, वृक्षारोपण आणि श्रमदान अशा उपक्रमांच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानाने ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाला चालना दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes