SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनारकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला वेग: रंगकर्मींच्या अटी मान्य, कोल्हापूर महापालिकेचा सकारात्मक निर्णय!कोल्हापूर महापालिकेच्या २,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश व साडीचे वाटप सुरूमहावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेटआमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे; कोल्हापुराती बंद दिवे लवकरच उजळणार‘गोकुळ’वर शेतकऱ्यांचाच ताबा राहणार; कोल्हापूरच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची' लढाई : सतेज पाटलांचा एल्गार! कोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा आज अखेरचा दिवस​"डिजिटल क्रांतीचे महाशक्तीपीठ: चला, सोशल मीडियाला बनवूया परिवर्तनाचे माध्यम!"गोकुळ निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले १०१ ठरावगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे “जोरदार शक्तीप्रदर्शन”; करवीरसह जिल्ह्यातील ३२४ ठराव दाखल

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्या २,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश व साडीचे वाटप सुरू

schedule30 Jun 26 person by visibility 242 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या गणवेशाचे वितरण आजपासून सुरू करण्यात आले. महापौर  रुपाराणी निकम यांच्या हस्ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे झालेल्या कार्यक्रमात प्रतीकात्मक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना ड्रेस व साडीचे वाटप करण्यात आले.

  महापालिकेच्या वर्ग ४ मधील शिपाई, पहारेकरी, वॉर्ड बॉय, वर्कशॉपमधील कर्मचारी तसेच सफाई व झाडू कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वापरासाठी गणवेश परिधान करणेस महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार आजपासून महापालिकेच्या १,८०० पुरुष कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड, तर ७०५ महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने 51 लाख खर्च करण्यात आला आहे.

  यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, राहुल माने, नगरसेविका सृष्टी जाधव, माधूरी व्हटकर, पुर्वा राणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, पल्लवी देसाई, राजनंदा महाडीक, माधूरी नकाते, वंदना मोहिते, निलांबरी साळोखे, शहर अभियंता रमेश मस्कर, भांडार प्रमुख विशाल सुगते, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, निलेश देसाई उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes