SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनारकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला वेग: रंगकर्मींच्या अटी मान्य, कोल्हापूर महापालिकेचा सकारात्मक निर्णय!कोल्हापूर महापालिकेच्या २,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश व साडीचे वाटप सुरूमहावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेटआमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे; कोल्हापुराती बंद दिवे लवकरच उजळणार‘गोकुळ’वर शेतकऱ्यांचाच ताबा राहणार; कोल्हापूरच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची' लढाई : सतेज पाटलांचा एल्गार! कोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा आज अखेरचा दिवस​"डिजिटल क्रांतीचे महाशक्तीपीठ: चला, सोशल मीडियाला बनवूया परिवर्तनाचे माध्यम!"गोकुळ निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले १०१ ठरावगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे “जोरदार शक्तीप्रदर्शन”; करवीरसह जिल्ह्यातील ३२४ ठराव दाखल

जाहिरात

 

महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेट

schedule30 Jun 26 person by visibility 105 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : सामाजिक बांधिलकी जपत महावीर गार्डन परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमींसाठी तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेट देण्यात आली. महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष मदन कानडे आणि उपाध्यक्ष राहुल हळदे यांनी ही यंत्रे महापौर  रुपाराणी निकम व महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द केली. हा कार्यक्रम महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात संपन्न झाला.

यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, राहुल माने, नगरसेविका सृष्टी जाधव, माधूरी व्हटकर, .पुर्वा राणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, पल्लवी देसाई, राजनंदा महाडीक, माधूरी नकाते, वंदना मोहिते, निलांबरी साळोखे, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा.अभियंता विद्युत नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, निलेश देसाई आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या स्मशानभूमीतील दैनंदिन कामकाज अधिक सुलभ व कार्यक्षम होण्यासाठी या लाकूड कटिंग यंत्रांचा उपयोग होणार असून, महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपने केलेल्या या सामाजिक योगदानाचे महापौर व आयुक्त यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes