SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन

schedule17 Jan 26 person by visibility 386 categoryक्रीडा

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतनला यावर्षी ' इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन ' (बी 1 झोन) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विभागीय स्तरावरील बुद्धिबळ (चेस) आणि कॅरम स्पर्धांचे आयोजन करण्याचा बहुमान प्राप्त झाला. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सातारा जिल्ह्यातील विविध डिप्लोमा इंजिनिअरिंग , फार्मसी तसेच आर्किटेक्चर महाविद्यालयातील गुणवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सांघिक प्रकारामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील. 

असोसिएशनतर्फे दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ही अत्यंत प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा असून खेळाडूंमध्ये या स्पर्धेची प्रचंड उत्सुकता असते. मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 या स्पर्धेचे आयोजन इन्स्टिट्यूटमध्येच केले असून संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेचे व्यवस्थापक अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे, क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. बुद्धिबळ आणि कॅरम क्षेत्रातील अनुभवी पंचांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी विभागीय स्तरावरील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. 

स्पर्धेच्या यशस्वी संचालनासाठी संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes