SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसादराज्यपाल निवासस्थानातील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणारजम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुकडीतील गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजनगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी कारवाई; हद्दपार केलेले ९ सराईत गुन्हेगार जेरबंदडॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीम

जाहिरात

 

डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कार

schedule19 Sep 26 person by visibility 267 categoryशैक्षणिक

वारणानगर : अभियांत्रिकी व शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांची ज्येष्ठ अभियंता ( ‘सीनियर इंजिनिअर’) या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोल्हापूर लोकल सेंटर यांच्या वतीने सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून हा सन्मान देण्यात आला.

५९ व्या इंजिनिअर्स डे निमित्त १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे हा सन्मान प्रदान करण्यात आला. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे. 

या गौरवाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्राचार्य डॉ. के. ए. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी डॉ. कारजिन्नी यांचे अभिनंदन केले.

या सन्मानामुळे वारणा शिक्षण समूहाच्या शैक्षणिक व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes