SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कारअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावाजागतिक रक्तदाता दिन: माणुसकीच्या रक्ताचे नाते!भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पणनशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाहीडीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसादशिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २४ जूनला पुनर्प्रवेश परीक्षा

जाहिरात

 

'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कार

schedule14 Jun 26 person by visibility 207 categoryउद्योग

  ▪️डॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव

 

  कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) च्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी झालेली निवड ही गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी केले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या बैठकीदरम्यान डॉ. गोडबोले यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजय सुद्रिक यांच्या हस्ते डॉ. गोडबोले यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

 

  यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक म्हणाले, “हा सन्मान केवळ डॉ. गोडबोले यांचा नसून संपूर्ण गोकुळ परिवाराचा आहे. दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील त्यांचे ज्ञान, अनुभव, नेतृत्व आणि संघटित कामकाजाची पद्धत यामुळेच हा मान योग्य व्यक्तीला मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे गोकुळचे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व अधिक भक्कम होईल आणि दुग्ध क्षेत्रातील विविध विषयांवर गोकुळची भूमिका प्रभावीपणे मांडली जाईल.”

 

  सत्काराला उत्तर देताना कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, “इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गोकुळ परिवाराने व्यक्त केलेल्या सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, संस्था सभासद, प्रशासकीय अधिकारी मंडळ, माजी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. भविष्यातही दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी तसेच गोकुळच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.

 

  यावेळी प्रशासक मंडळातील सदस्यांनी डॉ. गोडबोले यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

  या प्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक, सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, प्रकाश आडनाईक, प्रताप पडवळ, डॉ,व्ही.डी.पाटील, डॉ.एम.पी.पाटील, एस.आर.पाटील, भरत मोळे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes