SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया; ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पारगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कारअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावाजागतिक रक्तदाता दिन: माणुसकीच्या रक्ताचे नाते!भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पणनशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

जाहिरात

 

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

schedule14 Jun 26 person by visibility 193 categoryसामाजिक

  मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात मुरवणे आणि वाहून जाणारी माती थांबवणे ही गरज ओळखून 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

  मृद व जलसंधारण विभाग गेल्या काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करीत आहे. सध्या आम्ही 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली.

  मंत्री श्री.राठोड म्हणाले की, राज्यातील तलावांमध्ये, बंधारे व धरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भरपूर गाळ साचला आहे. हा गाळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. ते नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. जर आपण धरणातील हा गाळ काढून शेतात टाकला, तर दोन फायदे होतात. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठा निर्माण होईल आणि तो अधिक दिवस टिकेल. तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढेल आणि शेतकरी सुखी होईल.

  छोटे-छोटे बंधारे बांधणे, नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करणे, पावसाचे पाणी अडवणे ही कामे आज राज्यभर सुरू आहेत. पण हे काम फक्त शासनाचे नाही, या कामात समाजाचेही योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत सहभाग घ्यावा. आपण जर आज पाणी अडवले, माती अडवली, तर उद्याची पिढी आपल्याला धन्यवाद देईल. पर्यावरण वाचवायचे असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल, तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असे ही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes