वाहन चालकाला एक वर्षाची साधी कैद; उचगाव येथील अपघातात लहान मुलाच्या मृत्यूचे प्रकरण
schedule04 Jan 25 person by visibility 244 categoryगुन्हे
कोल्हापूर : निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लहान मुलासं गंभीर जखमी करुन त्यास कोणत्याही प्रकारची वैदयकीय मदत न करता निघून जावून आणि त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरलेचा गुन्हा शाबीत झाल्याने मोटार चालक सद्दाम मुन्ना जत्राटे (वय ३०, रा. मदीना कॉलनी, उचगांव, ता. करवीर) याला एक वर्षाचे साध्या कैदेची शिक्षा आणि वेगवेगळ्या कलमांखाली त्याला रक्कम रुपये १२,५००/- इतक्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसोो क्रमांक ७ यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सरकारी वकील सुर्यकांत बी. पोवार यांनी काम पाहीले.
उचगांव येथील मदीना कॉलनी येथे दिनांक २९/१०/२०१९ रोजी हि घटना घडली होती. सदर दिवशी सायंकाळी ४ च्या सुमारासं यातील मयत लहान मुलगा ताहीर यासिन गडकरी (वय ४ वर्षे, रा. मदीना कॉलनी, उचगांव, ता. करवीर) हा रस्त्याचे बाजुला उभा होता. त्यावेळी रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे यातील आरोपी सद्दाम मुन्ना जत्राटे याने त्याचे ताब्यातील वॅगनआर चार चाकी वाहन चालवून ताहीर यांस जोराची धडक दिली त्यामुळे ताहीर हा गाडीसोबत फरफटत गेला आणि त्याचा हात चारचाकीवाहनाच्या पाठीमागील चाकात अडकुन तो गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी आरोपी हा तेथे न थांबत वाहनासंह निघून गेला. जमलेल्या लोकांनी जखमी मुलासं दवाखान्यात घेवून गेले परंतु अपघाती जखमांचेमुळे तो मयत झाला होता. या प्रकरणी जत्राटे याचे विरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयाचा तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक फौजदार आर.एल. पाटील यांनी करुन न्यायालयात आरोपी विरुदध दोषारोपत्र दाखल केले होते.
दरम्यान या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्र. ७ यांचे न्यायालयसमोर झाली. सरकारी वकील सुर्यकांत पोवार यांनी एकुण सहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकील पोवार यांचा युक्तीवाद ग्राहय मानुन न्यायालयाने जत्राटे याला विविध कलमांखाली शिक्षा सुनावली.