लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर तातडीने निर्णय घ्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे; 165 अर्ज प्राप्त
schedule06 Jan 25 person by visibility 206 categoryराज्य
कोल्हापूर : दिनामध्ये प्राप्त प्रलंबित अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशही दिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, प्रत्येक विभागाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपल्याकडील प्रलंबित अर्जांवर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी काही तास देवून त्यावर काम करणे आवश्यक आहे. आलेल्या तक्रारी तसेच अर्ज वेळेत पाहून त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे. प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी तसेच नागरिकांना अधिसूचित सेवा वेळेत देण्यासाठी मोहिम राबवून कामे करा, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
आज झालेल्या लोकशाही दिनादिवशी शासकीय निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळण्यासाठी एकूण 165 अर्ज प्राप्त झाले आहे.