SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रब्बी हंगाम 2024 पीकस्पर्धा निकाल जाहीरकोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाईसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्ययेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनमहाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशनमाजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळाकोल्हापूर महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई‘गोकुळ’चे २५ लाख लिटर दूध संकलन सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार : नामदार हसन मुश्रीफनगरपालिका निवडणुकीसाठी शाहू छत्रपती, सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक

जाहिरात

 

ऊर्जा, इच्छाशक्ती आणि जोखीम घेण्याची तयारीच आपल्याला जीवनात यशस्वी करते : संकर्षण कऱ्हाडे

schedule12 Oct 25 person by visibility 386 categoryशैक्षणिक

▪️केआयटी, कोल्हापूर येथे ‘अभिग्यान- पूर्वरंग सोहळा २०२५’ उत्साहात 

कोल्हापूर  :  “तुमच्यात धमक असेल, इच्छाशक्ती असेल आणि एखादं कौशल्य असेल, तर चंदेरी दुनियेत अवश्य या,” असा प्रेरणादायी संदेश सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी दिला. ते केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयात येथे आयोजित ‘अभिग्यान पूर्वरंग सोहळा २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमात येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘अभिग्यान’ महोत्सवाच्या १३ व्या पर्वासाठी ४ मान्यवर पाहुण्यांची घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या अभिग्यान कार्यक्रमासाठी ‘क्विक हिल’ चे संजय काटकर,सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग, प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि ए.आय.तज्ञ श्री.चिन्मय गव्हाणकर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची प्रा.प्रमोद पाटील यांनी घेतलेली जाहीर मुलाखत.या संवादात त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास, कलाक्षेत्रातील अनुभव, तसेच तरुणाईसाठी ऊर्जा आणि प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाने आणि विनोदी शैलीने रंगलेल्या या मुलाखतीत ‘रॅपिड फायर राउंड’ ने कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केआयटीचे उपाध्यक्ष उद्योजक सचिन मेनन होते.  सचिन मेनन यांनी या अभिग्यान या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान,सामाजिक,उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या  सकारात्मक व्यक्तींची ओळख व त्यांचे विचार पोहोचवले जातात अशा प्रकारच्या आशयाचे मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी संचालक डॉ.मोहन वनरोट्टी आणि माजी विद्यार्थी व उद्योजक चेतन नरके उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयम पाटील आणि अंकिता गिड्डे यांनी केले, तर प्रास्ताविक शिवेंद्र देसाई यांनी केले.आभार प्रदर्शन आदित्य साळुंखे आणि समीक्षा बुधले यांनी केले. अभिग्यान समन्वयक प्रा.अमर टिकोळे  यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर अभिग्यान सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव यांनी ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अभिग्यान २०२५ मधील पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे नियोजन ‘वॉक वुईथ वर्ल्ड’ या विद्यार्थी व्यासपीठाने केले.प्रेरणा, संवाद आणि उत्साहाने भारलेला ‘अभिग्यान पूर्वरंग सोहळा २०२५’ हा कार्यक्रम तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes