SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शिवसेनेत मोठा भूकंप: जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा तडकाफडकी राजीनामा!पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार​"कोल्हापूरच्या हद्दवाढीवर निर्णय घ्या, ...": आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली सरकारची कोंडी!राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटनशिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदेकळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहन

जाहिरात

 

पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित

schedule25 Jun 26 person by visibility 69 categoryराज्य

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे १८ मे २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १४ नागरिकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण ७० लाख रुपयांचा निधी पालघर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित मृतांच्या वारसांना वितरित करण्यात आला.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सुरेश रत्ना लाखात (वय ४७), पांडू गणपत लाखात (वय ४५), कलु गोविंद लाखात (४८), सुनील अर्जुन दांडेकर (वय ३५), चिमा गोविंद कुऱ्हाडा (वय ७५), नमिता विठठ्ल दांडेकर (वय १४), सारिका संतोष लाखात (वय ३८), आयुष्य सिताराम लाखात (वय १६), सागर नामदेव शेंडे (वय १५), वंदना शिवराम वळवी (वय ४०), सलोनी शिवराम वळवी (वय १२), अजय चंदर आहाडी (वय १९)  आणि रियांशी संतोष लाखात (वय ४) आणि कुणाल रवींद्र रावते सर्व राहणार बापूगाव यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ७० लाख रुपयांची आर्थिक मदत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes