उज्जीवन स्मॉल फायनान्सच्यावतीने सावित्रीबाई फुले रुग्णालयास पाच लाखाची उपकरणे व साहित्य
schedule04 Sep 24 person by visibility 404 categoryआरोग्य

कोल्हापूर : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्यावतीने महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयासाठी सी.एस.आर. फंडामधून ५ लाख इतक्या रक्कमेची वैद्यकिय उपकरणे व साहित्य आज देण्यात आले. या साहित्याचा लोकापर्ण सोहळा सकाळी १०.०० वाजता सावित्रीबाई फुले रूग्णालयात पार पडला.
या सोहळ्यास उज्जीवन स्मॉल फायनान्सचे जिल्हा प्रमुख व्यवस्थापक गणेश गोडसे, पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दक्षता कृष्णकांत राणे, प्रादेशिक व्यवस्थापक सामाजिक सेवा वैभव भगत, प्रेरक समाजसेवा गणेश मोरे, वरिष्ठ प्रादेशिक सेल्स मॅनेजर पराग पगारे, क्षेत्र व्यवस्थापक राजय निकम, सूक्ष्म बँकेचे पदाधिकारी,
आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, सवित्रीबाई फुले रुग्णालयाच्या प्रशासकिय वैद्यकिय अधिकारी डॉ.संजना बागडी, बालरोग तज्ञ डॉ. रूचिका यादव, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया वासनिक, भूलतज्ञ डॉ.अमृता रावराणे, डॉ.अनिरूध्द काळेबेरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.