आगामी महापालिकेसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे : चंद्रकांतदादा पाटील
schedule06 Dec 25 person by visibility 78 categoryराजकीय
▪️निवडणुकीत भाजपाच्या सक्षम कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही
कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कोल्हापूर येथे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक निवडणूक मोठ्या तयारीने लढवत असतो.
आगामी निवडणुकीची तयारी देखील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोमाने करत आहे. या निवडणुकीत भाजपाच्या कोणत्याही सक्षम कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही.
यावर्षी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जनतेच्या मनातील जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बूथ स्तरापर्यंत प्रवास करून या नागरिकांच्या सूचना आपल्याकडे नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हा जाहीरनामा केवळ कागदावरच नसेल तर कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा आकांक्षाचे प्रतिबिंब असेल. राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा वाहत आहे आपल्या सरकारने गोरगरिबांसाठी घरे, शेतकऱ्यांसाठी योजना, तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी सुरक्षितता यावर विशेष भर दिला आहे. आयुष्यमान भारत पासून हर घर जल पर्यंत योजनांनी कोट्यावधी लोकांची जीवन सुधारले आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन याप्रसंगी केले.
त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून अद्यापही ज्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म जमा केलेली नाहीत अशांनी आपले फॉर्म दोन दिवसात भाजपा जिल्हा कार्यालयात जमा करावेत.
याप्रसंगी संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव,
प्रा.जयंत पाटील, प्र का सदस्य राहुल चिकोडे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस व मंडल अध्यक्षांची उपस्थिती होती.