प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी संपवले जीवन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
schedule03 Nov 24 person by visibility 339 categoryगुन्हे
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. ५२ वर्षीय कन्नडचे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले. गुरुप्रसाद यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कर्नाटकातील मदनैयाकहल्ली भागातील त्यांच्या घरात गुरुप्रसाद यांचा मृतदेह सापडला. गुरुप्रसाद मागील ८ महिन्यांपासून त्या घरात राहत होते. दिग्दर्शकांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरातून दुर्गंध येत होता. यामुळे त्यांच्या शेजारी लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस तपासात घरात कुजलेल्या अवस्थेत गुरुप्रसाद यांचा मृतदेह आढळून आला. .पोलीस दिग्दर्शक गुरुप्रसाद यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत सापडला.
गुरुप्रसाद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास करण्यात येत आहे. गुरुप्रसाद हे कर्जात बुडाले होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.