SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

‘गोकुळ’वर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती; संजयकुमार सुद्रीक अध्यक्ष

schedule05 May 26 person by visibility 310 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक मंडळ बाजूला होऊन प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलमांनुसार पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध सहनिबंधक यांनी हे पाऊल उचलले आहे. 

कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांची प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली असून, त्यांच्यासोबत प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे आणि चंद्रकांत परुळेकर या चार सदस्यांचा समावेश आहे.

प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांनी स्पष्ट केले की, ही नियुक्ती कोणत्याही चौकशीसाठी नसून केवळ दैनंदिन कामकाजासाठी केलेली एक पर्यायी व्यवस्था आहे. पाच लाख दूध उत्पादकांच्या कष्टाने निर्माण झालेल्या ‘गोकुळ’ ब्रँडला कोणताही धक्का लागू न देता पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.


या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांनी "आता दूध उत्पादकांना न्याय मिळेल आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांची सुटका होणार नाही" अशी प्रतिक्रिया दिली, तर माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी मंडळाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी काळात मतदार याद्यांचे काम पूर्ण करून स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान या नवनियुक्त मंडळासमोर असणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes