SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जयसिंगपूर येथे वित्तीय जागरूकता व साक्षरता कार्यक्रम संपन्नलिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना आमदार यड्रावकर यांचा जाहीर पाठिंबा कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम 'न भूतो न भविष्यति' करूया.... !जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण : पालकमंत्री प्रकाश आबिटकरराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखालीकेंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरणगणित आणि संख्याशास्त्रामध्ये ‘एआय’चा पाया: कुलगुरू डॉ. राजनीश कामततरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे : मंत्री हसन मुश्रीफ लंडनची 'टॉवर सबवे': जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वेअजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मान

जाहिरात

 

जयसिंगपूर येथे वित्तीय जागरूकता व साक्षरता कार्यक्रम संपन्न

schedule02 Aug 26 person by visibility 97 categoryउद्योग

◼️रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लोकपाल कार्यालय व यड्राव बँकेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम 

जयसिंगपूर  : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लोकपाल कार्यालय, मुंबई व यड्राव को ऑप बँक लि. यड्राव यांचे संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर (जि. कोल्हापूर ) येथे वित्तीय जागरूकता व साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी केले. त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्त्व, ग्राहकांचे हक्क आणि सुरक्षित बँकिंग व्यवहारांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.
यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबईचे सहाय्यक महाप्रबंधक रवींद्र वाकडे यांनी दृकश्राव्य माध्यमातून रिझर्व्ह बँक – एकात्मिक लोकपाल योजना, 2026 विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बँकिंग तक्रार निवारण प्रणाली, ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आणि ग्राहकांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली.

बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर चे क्षेत्रीय प्रबंधक  ऋष सोरंग यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व, डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच तक्रार निवारण प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.  बँक ऑफ इंडिया कोल्हापूर चे क्षेत्रीय प्रबंधक श्री. विशाल कुमार सिंग यांनी सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि ग्राहक जागरूकतेवर आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हा अग्रणी बँके तर्फे  शासनाच्या विविध वित्तीय समावेशन योजनांची माहिती देण्यात आली. यड्राव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी, आवश्यक उपाययोजना, सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि डिजिटल सुरक्षिततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यड्राव सहकारी बँक तसेच परिसरातील विविध बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा व सातारा जिल्ह्यातील बँकेचे अधिकारी कर्मचारी व ग्राहकवर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes