प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते ध्वजारोहण
schedule23 Jan 25 person by visibility 679 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता छत्रपती शाहू स्टेडीयम, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.