SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
32 गरजू बाल हृदय रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणारजागतिक पालक दिन: निस्वार्थी प्रेमाचा आणि बलिदानाचा सन्मानजागतिक दूध दिन: आरोग्याचा आणि समृद्धीचा एक गोड सोहळाकोल्हापूर: एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिला चोरट्यास पुण्यातून अटक; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्तछत्रपती शिवाजी मार्केट, महापालिका व केएमटी वर्कशॉपची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडून पाहणी ​"शेतकरी कर्ज वसुलीला तत्काळ 'ब्रेक' लावा; पीक कर्ज पुनर्गठनासाठी सतेज पाटलांचा एल्गार"जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित नवीन नियमांचा शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा; आमदार सतेज पाटील यांचा तीव्र निषेध; ५ जूनपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन जैवविविधता टिकविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब आवश्यक : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुधीर कुंभारहितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल : चंद्रकांतदादा पाटीलकोरे अभियांत्रिकी स्थापत्य विभाग व आयएसएसइ यांच्यात सामंजस्य करार

जाहिरात

 

32 गरजू बाल हृदय रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार

schedule01 Jun 26 person by visibility 137 categoryआरोग्य

◼️ कोल्हापूरमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षतर्फे 0 ते 18 वयातील मुलांची 2D ECHO तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिर संपन्न, 225 रुग्णांची मोफत तपासणी

 कोल्हापूर : लहान बालकांना घेऊन आलेल्या पालकांच्या भिरभिरणाऱ्या नजरा...मनात काहूर... माझ्या मुलाची योग्य शस्त्रक्रिया होईल का? असे अनेक प्रश्न मनात बाळगून आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांना आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक आशेचा किरण मिळाला.... दिवसभरात झालेल्या हृदय तपासणीतून पालकांना मोठा दिलासा मिळाला. 225 बाल रुग्णांची तपासणी झाली. त्यात मधील 32 बालकांना हृदयाला छिद्र तसेच हृदयाचा त्रास असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डॉ. राहुल सराफ, Coneultant Pediatric Cardiologist 
डॉ. अभिजित नाईक, Consultant Pediatric Cardiac Surgeon
यांनी बालकांची तपासणी करून पालकांना योग्य मार्गदर्शन केले.
 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुर मध्ये आयोजित लहान मुलांच्या हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला.

या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे  शिबिरार्थींशी संवाद साधला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची माहिती दिली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.

 शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत,आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, जिल्हा समन्वयक विनायक साळोखे,जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, सेवा रुग्णालय प्रमुख डॉ. नीलिमा पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर जिल्हाप्रमुख मनमोहन खोत, महिला जिल्हाप्रमुख धनश्री देसाई, उप जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उप जिल्हाप्रमुख गणेश कदम, कोल्हापूर शहर प्रमुख विनायक जाधव, कोल्हापूर शहर संघटक प्रशांत पाटील, उपशहर प्रमुख अतुल साळोखे, उपशहर प्रमुख अनिल सावंत, करवीर तालुका प्रमुख नवनाथ खोत, शिरोळ तालुका प्रमुख सचिन डोंगरे, कागल तालुका प्रमुख फरिन मकुभाई, गगनबावडा तालुका प्रमुख अक्षय साखरे, इचलकरंजी हातकणंगले तालुका प्रमुख अमित रणनवरे, शिरोळ महिला तालुकाप्रमुख रोहिणी सांबरेकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes