SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्याध्यापिका सविता पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडियल टीचर' पुरस्कार प्रदानकळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईचा १९ वा उत्सव सोहळा ९ मे पासून; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनविश्वकवी रवींद्रनाथ टागोर: भारतीय साहित्याचा मानदंडलिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडडिजिटल युगात 'सायबर प्रतिकारशक्ती' काळाची गरज - राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथनविविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावाडी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या प्रा प्रल्हाद गवळी यांना पीएच. डी.डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे 'अभियंता करंडक' आणि 'वसंत करंडक' स्पर्धेत यशविनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

जाहिरात

 

कळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईचा १९ वा उत्सव सोहळा ९ मे पासून; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

schedule07 May 26 person by visibility 114 categoryसामाजिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये होमहवन आणि महाप्रसाद सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. शनिवार, दि. ९ मे २०२६ ते शुक्रवार, दि. १५ मे २०२६ या कालावधीत हा उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा होणार असून, या उत्सवाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे.

▪️धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा:
उत्सवाची सुरुवात शनिवार दि. ९ मे रोजी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाने (९ वा व १२ वा अध्याय) होणार आहे. दररोज रात्री भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ह.भ.प. श्री गुरु गोपाळ (आण्णासाहेब) तुकाराम वासकर महाराज (पंढरपूर), ह.भ.प. संग्राम बापू भंडारी (आळंदी) यांची कीर्तने तसेच विविध नामांकित भजन मंडळांची 'संगीत सोंगी भजने' भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील.

▪️ उत्सवातील विशेष आकर्षणे:
 ▪️बुधवार, दि. १३ मे: सकाळी श्री कात्यायनी देवीच्या भेटीस पालखी सोहळा प्रस्थान करेल.
▪️गुरुवार, दि. १४ मे: सकाळी होमहवन होईल. दुपारी ३ वाजता महिलांसाठी 'कुंकुमार्जन सोहळा' आयोजित केला असून रात्री ८ वाजता मुख्य पालखी सोहळा हनुमान भेटीसाठी निघणार आहे.
 ▪️शुक्रवार, दि. १५ मे (मुख्य दिवस): या दिवशी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आणि सकाळी ११ वाजल्यापासून महाप्रसाद वाटपास सुरुवात होईल.
▪️प्रमुख उपस्थिती व प्रवचन:
शुक्रवार दि. १५ मे रोजी रात्री ७ वाजता सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ येथील पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचे समाजप्रबोधनपर प्रवचन होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता 'सलाम महाराष्ट्र सुवर्ण संस्कृतीचा' हा लोकोत्सवाचा कार्यक्रम सादर केला जाईल.

या उत्सवासाठी कळंबा गावातील सर्व तालीम मंडळे, तरुण मंडळे, महिला बचत गट आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन'श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ, कळंबा' यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes