महाविकास आघाडीचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार प्रारंभ
schedule04 Nov 24 person by visibility 370 categoryराजकीय
शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार सुप्रियाताई सुळे आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या या संपूर्ण भागामध्ये गेले 70 -75 वर्ष जर एका विचाराने हा भाग चाललेला आहे. तो म्हणजे महात्मा गांधींच्या काँग्रेसचा विचार या सगळ्या भागांमध्ये आहे, काँग्रेसवर प्रेम करणारे विश्वास ठेवणारे आपण सगळे लोक आहोत. आणि सतेज पाटील तुम्ही काळजी करू नका या भागाचा विकास सारे पाटलांच्या हाताने होणार आहे. गणपतराव पाटील यांच्या कुटुंबियांचे योगदान मोठे आहे. अनेक दशक या भागात त्यांचे काम आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. आणि गणपतराव पाटलांना एका विश्वासाच्या नात्याने महाविकास आघाडी एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सीट वाटप झाल्यानंतर उल्हास पाटील यांच्याशी मी दोन तास चर्चा केली. त्यांना समजून सांगितले या उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठे केले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू नका. आजचा काळ उद्या या ठिकाणी येईल तुम्ही काळजी या ठिकाणी करू नका. ज्यावेळी गोकुळची निवडणूक लागली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुजित मिणचेकर यांना गोकुळमध्ये घ्या सांगितले. मुरलीधर जाधव यांना गोकुळमध्ये घेण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे तुम्हाला चालले. आता का चालत नाहीत हा प्रश्न माझा या ठिकाणी आहे. त्यामुळे येथील शिवसैनिकांना आवाहन आहे् ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अपमान केला. शिवसैनिकांना आवाहन आहे की त्यांनी आपली ताकद मतदानातून दाखवावी.
यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज, यांच्यासह मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये उमेदवार गणपतराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला. उमेदवार गणपतराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर , माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे जी, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादीचे व्हि. बी. पाटील, रावसाहेब भिलवडे, शिवसेनेचे संजय पवार, चंगेज खान पठाण, वैभव उगळे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक अनिलराव यादव यांच्यासह पृथ्वीराजसिंह यादव, ए. बी. पाटील, मधुकर पाटील, संजय अनुसे, धनाजीराव जगदाळे, विजय पाटील, माधुरी सावगावे, स्वाती सासणे, भवानी घोरपडे, आजी- माजी नगरसेवक तसेच कारखान्याचे अन्य संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.