SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीरकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यशसमाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदेबोगस जात दाखल्यांविरोधात कोल्हापुरात ९ मार्चला 'संघर्ष महामोर्चा'; अनुसूचित जातीच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना दणका देण्याचा निर्धार!डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी घेतला चंद्रग्रहणाचा विलक्षण अनुभवसुरक्षितता: केवळ एक नियम नव्हे, तर जगण्याची शैली!जेष्ठांचा अनुभव हीच व्यवसायाची शिदोरी; कोल्हापुरात अमृतमहोत्सवी व्यापाऱ्यांचा दिमाखदार सत्कारमागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णयकोल्हापूरकरांनो लक्ष द्या! परीख पूल परिसरात वाहतुकीत मोठे बदल; ४५ दिवस 'हे' मार्ग राहणार बंद

जाहिरात

 

तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

schedule04 Mar 26 person by visibility 98 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : तोंडातील बुरशीजन्य संसर्गावर (ओरल थ्रश/कॅन्डिडिआसिस) मात करण्यासाठी अँटीफंगल ओरल जेल विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळवले आहे. या ओरल जेलमध्ये २-डिऑक्सी ग्लुकोजचा वापर करण्यात आला आहे. 

विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लेनरी स्टडीजमधील स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अश्विनी काळे  आणि संशोधक विद्यार्थिनी डॉ. तंजिला कोटलगी यांनी अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले.

या ओरल जेलमध्ये  २-डिऑक्सी ग्लुकोज या औषधाचा वापर करण्यात आला असून, ते तोंडातील फंगल संसर्गावर प्रभावी ठरणार आहे. औषधांच्या उच्च मात्रांमुळे अनेकदा साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागणाऱ्या एचआयव्ही रुग्णांसाठी हे जेल  विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.  या जेलमुळे तोंडातील बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारात बदल अपेक्षित आहेत. औषधांची आवश्यकता आणि उपचाराचा कालावधी कमी होईल, अशी माहिती डॉ. अश्विनी काळे यानी दिली. 

हे संशोधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ज्युनियर रिसर्च फेलोशिप योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील आणि प्रा. डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांनी संशोधकांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes