SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सावधान! कोल्हापुरात १६ मार्चपासून 'हेल्मेट' सक्ती; विना हेल्मेट टोल नाक्यावर 'नो एन्ट्री'जनगणनेचे काम अचूक असावे : जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षितभाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणीशासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीरकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यशसमाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदेबोगस जात दाखल्यांविरोधात कोल्हापुरात ९ मार्चला 'संघर्ष महामोर्चा'; अनुसूचित जातीच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना दणका देण्याचा निर्धार!डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी घेतला चंद्रग्रहणाचा विलक्षण अनुभवसुरक्षितता: केवळ एक नियम नव्हे, तर जगण्याची शैली!

जाहिरात

 

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!

schedule04 Mar 26 person by visibility 146 categoryगुन्हे

▪️शिये येथून आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; ३ कोटी ६२ लाखांचा होता अपहार

कोल्हापूर : "चार महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो," असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सान्वीक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. गोविंद शिवाजी पाटील (रा. शिये, ता. करवीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

आरोपीने कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील आयोध्या टॉवरमध्ये 'सान्वीक वेल्थ मॅनेजमेंट' नावाने कार्यालय थाटले होते. अल्पावधीत दामदुप्पट परताव्याचे स्वप्न दाखवून त्याने अनेक गुंतवणूकदारांकडून सुमारे ३ कोटी ६२ लाख रुपये गोळा केले आणि त्यानंतर पोबारा केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये फसवणुकीसह MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक  योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे  पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात होती. आरोपी गोविंद पाटील हा शिये येथील राहत्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती  जालिंदर जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

 नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही 'दामदुप्पट' आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोनि सुशांत चव्हाण, पोसई जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, महेश आंबी, अमित सर्जे, समीर कांबळे आणि सुशील पाटील यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes