SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसंदर्भात कोल्हापुरात चर्चासत्रकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगेधर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटीलपंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूरस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभकोल्हापूर महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींची शुक्रवारी सुनावणीवसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढसंभापूर औद्योगिक वसाहत येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने असल्याने उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे : संस्थेच्या अध्यक्षा, माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहनभागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

schedule06 Dec 24 person by visibility 491 categoryउद्योग

▪️मुंबई येथील इंटर डेअरी अ‌ॅवार्ड मध्ये विशेष समारंभात सन्मान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व सर्व संचालक व अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ मुंबई (गोरेगाव) येथील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे संपन्न झाला.

 या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ म्हणजे गुणवत्ता हे समीकरण दृढ झाले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदारपणा, चव यामध्ये गोकुळने सातत्य ठेवले आहे. यामुळे गोकुळची ख्याती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडत आहे. विविध देशातून दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर गोकुळ फुलला आहे. गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक हिताच्या योजना राबविल्या. या प्रदर्शनामध्ये दुग्धव्यवसायातील नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळल्या असून या प्रदर्शनात १२० हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी झाल्या आहे. त्याचबरोबर गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी-कर्मचारी व सर्व संबधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे.

 इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनतर्फे पाच ते सात डिसेंबर २०२४ या कालावधीत इंटर डेअरी प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात देशभरातील नामवंत दूध संघांचा सहभाग आहे. दुग्ध व्यवसायाशी निगडीत मशिनरीजचे स्टॉल हे प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनात गोकुळ दूध संघांचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

  गुरुवारी, सायंकाळी बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे इंटर डेअरी अॅवार्ड पार पडला. अतिशय दिमाखात पार पडलेल्या या सोहळयात प्रतिदिन १० लाख लिटर पेक्षा अधिक दूध हाताळणी, टी.एम.आर., आयुर्वेदिक पशुपूरक प्रकल्प, डेअरी मधील स्काडा सिस्टीम, सुक्का चारा व योग्य डेअरी व्यवस्थापन व नवनवीन तंत्रज्ञानाची दखल घेऊन गोकुळ दूध संघाला इंटर डेअरी अॅवार्डनी सन्मानित केले.

 पशुसंवर्धनासाठी उपयुक्त ठरलेल्या या हर्बल प्रकल्पाची देशपातळीवर गवगवा झाल्याचे पुरस्काराच्या निमित्ताने स्पष्ट झाले. पशुसंवर्धनासाठी पशुपूरक हर्बल प्रकल्प व प्रोसेसिंग अॅटोमेशनमधील कामगिरीची दखल घेऊन गोकुळला इंटर डेअरी अॅवार्डनी सन्मानित करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

  याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, गुजरात अमूल दूध डेअरी चेअरमन शामलभाई पटेल, सुमूल दूध डेअरी चेअरमन मानसिंहभाई पटेल, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, आय.डी.ए.चे प्रतिनिधी अनिल पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes