SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा 21 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळाकिल्ले पन्हाळगडावर 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोषशिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा; तालशास्त्रातील बारकावे आणि एकल वादनाने विद्यार्थी मंत्रमुग्धडी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते‘गोकुळ’ मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...कोल्हापूर महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादनरमजान : संयम, सेवा, श्रद्धेचा पवित्र महिना...इथे दररोज होतो शिवरायांचा जयघोष!स्वराज्य संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराजडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवड

जाहिरात

 

राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा 21 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळा

schedule19 Feb 26 person by visibility 81 categoryसामाजिक

▪️जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले असून, त्याचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता संपन्न होणार आहे. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस करवीचे तहसीलदार स्वप्निल पवार, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, अक्षय कुरणे, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी सी. एस. ओतारी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्राथमिक शिक्षण विभागाच्या रत्नप्रभा दवंडे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, शाहू स्मारक व्यवस्थापक दत्तात्रय नागर, अतुल पवार, बबनराव रातणे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, तसेच शिव प्रबोधिनीचे विजय पाटील उपस्थित होते. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना देवून जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकार्पण सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

हा सोहळा लोकोत्सवासारखा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यानिमित्ताने समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ‘शाहू समता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दुपारी 3 वाजता दसरा चौक येथून सुरू होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes