SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकरगोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनसहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरून 'गोकुळ'मध्ये राजकीय खळबळ!थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना: भारताच्या अंतराळ प्रवासाचा सुवर्णटप्पा!गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

वीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....

schedule02 Nov 26 person by visibility 11 categoryराज्य

◼️युवा शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर आघात....
◼️दुःखाच्या प्रसंगी शासनाचा मदतीचा हात
◼️वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप....

कागल  : म्हाकवे येथील युवा शेतकरी कै. रणजित सिद्राम पाटील यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कुटुंबातील तरुण आधार हरपल्याने पाटील कुटुंबावर ओढवलेल्या या संकटातून सावरणे अत्यंत कठीण झाले आहे. या दुःखद प्रसंगी शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रणजित सिद्राम पाटील यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मनुष्यहानीसाठी शासनाच्या नियमानुसार त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कार्यवाही करण्यात आली.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशान्वये कागलचे तहसीलदार कार्यालय यांनी कै. रणजित पाटील यांच्या वारसांना चार लाख रुपये (₹४,००,०००/-) इतकी मदत मंजूर केली आहे. याबाबतचे अधिकृत मंजुरी पत्र दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

एखाद्या कुटुंबातील तरुण कर्त्या व्यक्तीचे अशा दुर्दैवी घटनेत निधन होणे, ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. पैशाने माणसाची उणीव भरून निघू शकत नाही किंवा कुटुंबीयांचे दुःख कमी होऊ शकत नाही. मात्र अशा कठीण प्रसंगी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत कुटुंबाला काही प्रमाणात आधार देणारी ठरते.

◼️ मुश्रीफ फाउंडेशनचीही मदत....
दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबीयांचे मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी भेटून सांत्वन केले होते. तसेच या कुटुंबियांच्या सर्वतोपरी पाठीशी राहण्याचा दिलासा त्यांनी दिला होता. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी भेटून एक लाख रुपयांचा धनादेश या कुटुंबियांना दिला होता.

यावेळी मंत्री  मुश्रीफ म्हणाले, दुःखाची भरपाई कधीच होऊ शकत नाही; मात्र संकटाच्या काळात मिळालेला मदतीचा हात कुटुंबासाठी मोठा आधार ठरतो. या मंजूर मदतीमुळे दुःखाच्या काळात पाटील कुटुंबाला आर्थिक हातभार लाभणार आहे. रणजित यांच्या आठवणी कायम जपताना त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो.

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, वडील सिद्राम मारूती पाटील, आई  आक्काताई सिद्राम पाटील, बहिण  प्रियांका पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, जीवन कांबळे, कुलदीप गवंडी, विजय पाटील, आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes