महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन
schedule02 Oct 26 person by visibility 137 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. राजनीश कामत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. सुखदेव उंदरे, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर, डॉ. सोमनाथ पवार
आदींसह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.