SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

schedule06 Jun 25 person by visibility 162 categoryउद्योग

कोल्हापूर  : गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, हडलगे, सांबरे, नंदनवाड, मनमाड व तेगीनहाळ येथील सहा गावांमध्ये 05 जून 2025 रोजी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, नैसर्गिक शेती, मृदा आरोग्य आणि पशुपालन यासंबंधी माहिती देण्यात आली. या अभियानाचा कालावधी २९ मे ते १२ जून २०२५ असा असून, देशभरातील ७०० जिल्ह्यांमध्ये १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. 

ऊस शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि सिंचन पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी मिश्र पीक पद्धती, मृदा आरोग्य तपासणी आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचा अवलंब करण्याचे शेतकऱ्यांना सुचविले.

शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकत्रितपणे मिळवण्यासाठी विविध 'ॲप' आणि संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या 'एक खिडकी योजने' च्या माध्यमातून, शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियाची माहिती देण्यात आली. श्री सिद्धगिरी  कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग, (आत्मा), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, तसेच आयसीएआर अंतर्गत विविध संस्थांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे. 

या कार्यक्रमात राजेंद्र वावरे, श्री सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक केले आणि शेतकऱ्यानं जास्ती जास्त या अभियानामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावे असे आवाहन केले. डॉ. नरेंद्र, डॉ. शिवकुमार व कृषी संशोधन केंद्र, गडहिंग्लजचे दलाल सर यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी कंपनीचे सदस्य, नवाचार करून चांगले शेती व शेती निगडित व्यवसाय करणारे शेतकरी व महिला उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केव्हिकेचे पांडुरंग काळे, राजेंद्र वावरे, डॉ. सुनील कुमार, डॉ. पुष्पनाथ, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes