SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदान

schedule06 Jun 25 person by visibility 241 categoryसामाजिक

  कोल्हापूर: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना उबाठा चे उपनेते संजय पवार, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी शिबिरास भेट दिली.

  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

  यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, आदम शेख, प्रथमेश सूर्यवंशी, अभिजित कांबळे, दत्तात्रय बोनगाळे, राजेश खांडके, सफवान काझी, राकेश गायकवाड, लाला बिरजे, संजय नलवडे, चेतन चौगुले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes