कोल्हापूर : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
▪️जल साक्षरता व भूजल जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोल्हापूर आयोजित राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प अंतर्गत जल साक्षरता व भूजल जनजागृती चित्ररथाचे राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन करुन हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जल साक्षरता व भूजल जनजागृती माहिती पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. या चित्ररथामार्फत पूर्वेकडील तीन तालुक्यामध्ये गावागावांत भूजल जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी कामगार न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश एम. ए. मुळीक, गुप्त वार्ता विभागाच्या श्रीमती. माने, भूजल विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.