कोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा दंडामध्ये 28 फेब्रुवारी अखेर 80 टक्के सवलत
schedule15 Jan 25 person by visibility 143 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये महानगरपालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. हि सवलत योजना दि.15 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीकरीता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मंजुरीने जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये निवासी, अनिवासी मिळकतीसाठी दि.15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी अखेर 80 टक्के व दि.1 ते 31 मार्च अखेर 50 सवलत दिली जाणार आहे. या सवलत योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर अद्याप न भरणा केलेने चालु आर्थिक वर्षात थकीत झाले मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या सवलत योजनेचा लाभ दि.15 जानेवारी 2024 पासून अंतीम दि.31 मार्च 2024 तारखेपर्यत थकबाकीदाराने त्याची मूळ थकबाकी व नोटीस, वॉरटं इत्यादींसह एक रक्कमी रोखीने रक्कम भरलेस दंड व्याजामध्ये देण्यात येईल. यासाठी मिळकतधारकांने संपूर्ण थकबाकी रक्कम व सुट वजा जाता होणारा दंड व्याज अशी एकूण रक्कम रोखीने भरणा करणे आवश्यक आहे. ज्या मिळकत धारकांची मिळकत थकबाकीपोटी सिल करण्यात आली आहे अशा मिळकत धारकांना सुद्धा या सवलत योजनेचा लाभ/सूट देण्यात येणार आहे. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीत कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घेणा-या संबंधीत मिळकत धारकास याचा लाभ दिला जाईल. जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षणासाठी आवेदन, संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर या योजनेअंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील. ही योजना नमूद केलेल्या कालावधीत जमा केलेल्या रक्कमांनाच लागू राहील. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना सवलत मिळणार नाही. योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी या योजनेअंतर्गत दावा करता येणार नाही. या योजनेचा लाभ शहरातील थकीत मिळकंतीबरोरच सर्व शासकीय मिळकतीना देखील लागु करण्यात आला आहे.
▪️सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रे दि.31 मार्च 2025 अखेर दर शनिवारीही सुरु राहणारमालमत्ता कराची (घरफाळा) रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात जमा करण्याची सुविधा आहे. नागरिकांच्या सोईकरीता दि.31 मार्च 2025 अखेर दर शनिवारी देखील सुट्टीचे दिवशी सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहे. मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या https://web.kolhapurcorporation.gov.in/ या वेबसाईटवर व अँड्रॉइड मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरी सुविधा केंद्रात किओस्क (Kiosk) यंत्रावर ऑनलाईन पेंमेंटची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गुगल पे, फोन पे, ॲमेझोन पे, यांसारखे यूपीआय वॉलेट्सव्दारेही मिळकत कर भरणा करता येणार आहे. नागरीकांनी आपल्या मिळकत कराची थकीत तसेच चालू आर्थिक वर्षाची एकूण रक्कम (दंडासहित) जाणून घेण्यासाठी https://propertytax.kolhapurcorporation.gov.in/KMCOnlinePG/NEWPropSearchOnly.aspx या लिकंचा वापर करुन पाहावी. एवढया मोठा प्रमाणत अशी सवलत योजना भविष्यात पुन्हा राबविली जाणार नाही याची संबंधीतांनी नोद घ्यावी.
तरी थकीत रक्कमेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिमातील तरतूदीनूसार 2 टक्के दंड, जप्ती, मिळकतींवर बोजा नोंद होणे सारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरीकांनी आपली मिळकत कराची रक्कम आजच जमा करून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. जे थकबाकीदार मिळकतधारक आपले कराचा भरणा करणार नाहीत त्यांचे मिळकतीवर जप्ती व बोजा नोंद करणे यासारखी कठोर कारवाई यापूढे सुध्दा करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त करदात्यांनी या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी थकीत कराचा एकरक्कमी भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.