SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
“महापौरपद हे कोल्हापूरच्या विकासाचे माध्यम; मला अधिक कालावधी मिळाल्यास शहराला ‘इंदूर’सारखे बनवण्याचा प्रयत्न करेन” : महापौर रूपाराणी निकमदुष्काळग्रस्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या अटीविना परीक्षा शुल्क माफ गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ यांची भावनामराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा ऐतिहासिक दीपस्तंभसीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटील

जाहिरात

 

“महापौरपद हे कोल्हापूरच्या विकासाचे माध्यम; मला अधिक कालावधी मिळाल्यास शहराला ‘इंदूर’सारखे बनवण्याचा प्रयत्न करेन” : महापौर रूपाराणी निकम

schedule19 Nov 26 person by visibility 147 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : राजकारणात पदे येतात आणि त्यांची मुदतही संपते; ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामुळे माझ्या ८–९ महिन्यांच्या कार्यकाळाबाबत आणि पुढील महापौराबाबत सुरू असलेल्या चर्चा साहजिक आहेत. मात्र, वरिष्ठ नेत्यांचा जो आदेश येईल, तो मला मान्य असेल, अशी स्पष्ट आणि संयमी भूमिका कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

महापौरपदाची निवड झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी माझ्या जिल्हाध्यक्षपदाच्या कामाची दखल घेत माझा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असेल, असे जाहीर केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. “महायुतीमध्ये शब्दाला महत्त्व आहे आणि दिलेला शब्द पाळला जाईल,” असा विश्वास व्यक्त करत, या विषयावर अद्याप वरिष्ठांशी थेट चर्चा झालेली नसली तरी आदेश येताच मी नक्कीच भेटेन आणि तो आदेश अंतिम असेल, असे त्या म्हणाल्या.

अनुभवाची शिदोरी सांगताना त्यांनी नमूद केले की, महापौरपदाचा कालावधी थोडा अधिक मिळायला हवा. कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा पूर्णत्वास नेण्यासाठी, नवे बजेट, स्मार्ट सिटी, वॉटर ऑटोमेशन, स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि गार्डन डेव्हलपमेंट यांसारख्या कामांना गती देणे आवश्यक आहे. यासाठी सीएसआर (CSR) तसेच इनरव्हील, रोटरी यांसारख्या संस्था व नागरिकांची मोठी साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

“मला जर कार्यकाळ वाढवून मिळाला, तर कोल्हापूर शहराला विकासाकडे नेण्याचा १०० टक्के प्रयत्न करेन,” असे सांगत रूपाराणी निकम यांनी आपले स्वप्न बोलून दाखवले. आज ज्याप्रमाणे लोक इंदूर शहर पाहण्यासाठी जातात, तसेच एके दिवशी इंदूरकरांनीही कोल्हापूर शहर पाहण्यासाठी यावे, इतका दर्जेदार विकास करण्याचा मानस असून, त्यासाठीच अधिक कालावधीची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes