माजी आमदार अशोकराव जांभळे यांचा वाढदिवस उत्साहात
schedule25 Jun 22 person by visibility 273 categoryसामाजिक

इचलकरंजी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार अशोकरावजी जांभळे यांचा ६७ वा वाढदिवस रक्तदान शिबीर, शालेय साहित्याचे वाटप व विविध स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरात १२० दात्यांनी रक्तदान केले.
इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नितीन जांभळे युवा मंच यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास युवक, युवती, महिला व भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरासाठी एम. एस. आय. ब्लड बँक सांगली यांचे सहकार्य लाभले. तर प्रवीण खाडे व मित्र परिवार यांच्या वतीने ६ शाळांमधील विद्यार्थ्यांना १० हजार वह्यांचे वाटप नगरसेवक नितीन जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याचबरोबर विकासनगर येथे महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन जांभळे, माजी नगरसेवक राजू खोत, तानाजी हराळे, लतिफ गैबान, रणजित जाधव, भाऊसो आवळे, रविंद्र कांबळे, परवेज गैबान, रणजित अनुसे, शिवाजी शिंदे, विष्णु नाकील, दशरथ माने, वसंत पाटील, विजय सावंत, वसंत मुळीक, सैफ मुजावर, नासिर अपराध, फैयाज मुल्लानी, सुरेंद्र सपकाळ, महिला आघाडीच्या रंजना बंडगर, लक्ष्मी नेसरी, बानुबी पठाण, संदीप पाटील, नितीन क्षिरसागर, हरिबा पाटील, अमर कोरोचीकर, विरेंद्र पाटील, भाऊसो कुंभार, सुरेश जाधव, सुधाकर कदम, जनार्दन गोडसे, आनंदा काटकर, आनंदा मस्के, नारायण ताम्हणेकर, आनंदा वाझे, प्रकाश नेमिष्टे, संजय नवाळे, मिथून नंदूरकर, सुभाष डावरे, रमेश कांबळे, सचिन कांबळे, दादासो पाटील, डॉ आरगे, त्र्यंबक दातार, विकी जावळे, अमोल भाटले, पप्पु लोंढे, अशरफ पेंढारी, दिलीप खोत, राहुल माळी, रियाज मुल्ला, वाजिद बांगी, सुशील आरेकर, शिवाजी पाटील, हर्षद कवठेकर, सुनील सरबी, सुरेश गंथडे, निलेश वरुडे, अमित मिश्रा, नितीन पुरी, आनंद भुतडा, अमर सुतार, अमर लोकरे, राहुल रसाळ, शादाब तांबोळी, प्रकाश पाटील, रवी लाटकर, असिफ शेख, प्रविण खाडे, चिराग देसाई, राहुल जाजू, वाजिद शेख, सागर कुंभार, दत्ता पवार, संदीप मोरे, फारुख मकानदार, धनंजय होगाडे, विजय गडाळे, सागर खराडे, शोएब पटवेगार, अमित खानाज, विजय गोरे, संतोष शिंदे, महेश घाटगे, जावेद मुजावर, संजय बडवे, गुड्डू शेख, अनिकेत घुरसाळे, संजय पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.