SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा १४ जूनला मुंबईतशेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रगती साधावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटीलशासकीय योजनांचा लाभ घेवून महिलांनी वेगवेगळ्या व्यवसायाद्वारे आपले कुटुंब सक्षम बनवावे : अरुंधती महाडिक शिवचाफा महोत्सवाला आजपासुन सुरवात 2000 रोपांचे वाटपकोल्हापूर जिल्ह्यामध्ये बकर ईद (ईदुल अजहा) मोठ्या उत्साहात ; मुस्लिम बोर्डीगच्या पटांगणावर नमाज पठाण मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन

जाहिरात

 

शिवचाफा महोत्सवाला आजपासुन सुरवात 2000 रोपांचे वाटप

schedule07 Jun 25 person by visibility 214 categoryसामाजिक

कोल्हापूर  : सावली सोशल सर्कल आयोजित शिवचाफा महोत्सवाची सुरवात आज प्रायव्हेट हायस्कुल मध्ये झाली. महाराजांच्या 351व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज या प्रकल्पामधील 2000 हजार रोपांचे वाटप पहिल्या टप्प्यात करण्यात आले. 

महाराजांचे प्रतिमा पूजन स्वा. सावरकर यांनी लिहिलेल्या महाराजांवरील आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या समाजसेवा विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवचाफा महोत्सव या विषयावरील पथनाट्य सादर केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सी. ई. ओ. कार्तिकेयन एस, अध्यात्मिक गुरू बाळ महाराज आणि प्रसिद्ध उद्योजक सुरेंद्र जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भोलेश्वर पलंगे, दत्तात्रय आपटे, सुहास कडू, मधुकर बाचुळकर, दिलीप बनछोडे  यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

ऑपरेशन सिंदूर च्या निमित्ताने माजी सैनिक कर्नल विलास सुळकूडे आणि मेजर गिरीजा मोहोळकर दुबे यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. 

शिवचाफा महोत्सवाप्रति असलेल्या भावना आणि मनोगते या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. छ. शिवाजी महाराजांप्रति श्रद्धा एक वेगळ्या विधायक मार्गातून कशी ठेवता येईल याच उदारहरण म्हणजे शिवचाफा महोत्सव. महाराज वर्षभरातून एका दिवसापुरते मर्यादित न राहता या चाफ्याच्या निमित्ताने सदोदित शिवप्रेमींच्या डोळ्यासमोर त्यांची प्रेरणा देत राहतील अशी आशा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.

या प्रकल्पासाठी स्मॅक कोल्हापूचे अध्यक्ष श्री सुरेंद्र जैन यांनी 5,00,000 रुपयांची देणगी दिली. कोल्हापूरकर अशा विधायक कार्यक्रमासाठी नेहमीच पुढे राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कार्यक्रमाची प्रस्तावना चंद्रशेखर फडणवीस यांनी केली. शिव प्रतिज्ञा  विनय गोखले यांनी घेतली. प्रकल्पाबद्दल माहिती तसेच या प्रकल्पातील भावी टप्पे याबद्दल किशोर देशपांडे यांनी माहिती दिली. सूत्र संचालन संतोष पंडित यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सखी गोखले यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये जेंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर पल चे पदाधिकारी आणि सदस्य, खेळघरच्या जुई कुलकर्णी, हृदयस्पर्श परिवाराचे पद्माकर कापसे, शिवछत्रपती पदक विजेते श्री विजय जाधव, वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक  मलमे आणि त्यांचे सहकारी, आसमाचे अविनाश पेंडुरकर, राष्ट्रपती पदक विजेते सागर बगाडे, शशिकांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes