SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीई च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस कंपनीत निवडकोल्हापुरात स्वर्गीय राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनजिल्हास्तरीय लोकशाही दिनात 163 अर्ज प्राप्तकिसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर कोंडेकर आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकार्यकर्त्यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारलय, आता येणाऱ्या निवडणुकीच मैदान मारण्यासाठी सज्ज रहावे; आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहनजैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु : मंगलप्रभात लोढा; जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटननूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात जल्लोषी स्वागतशेती केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार : उपमुख्यमंत्री अजित पवारजग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक

जाहिरात

 

बेकायदा होर्डिंग्ज,बोर्ड, बॅनर, फ्लेक्स चा सुळसुळाट; कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

schedule31 May 25 person by visibility 239 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर (करवीर काशी वृत्तसेवा) : शहरात कोठेही जा तुम्हाला बेकायदा होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स यांचा सुळसुळाट झालेला दिसतो, यामुळे अनेकदा   व्यक्तिगत पातळीवर इर्षा, त्यातून वर्चस्ववाद, भांडणे, मारामाऱ्या, वाद-विवाद अशा गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात, हे नित्याचे झाले आहे. यावर महापालिका प्रशासनाचा कसलाही अंकुश राहिलेला नाही, फक्त कुणी तक्रार केली किंवा अनुचित प्रकार घडला की तेवढ्यापुरते नियमावली सुरू करायची आणि काही दिवसांनी पुन्हा गोंधळ सुरू होतो.

 याबाबत कितीही जनजागृती केली तरी हे प्रकार नित्याचे झाले आहे. यातून शहराचे सौंदर्य नष्ट होत असून शहर विद्रूप होत आहे, संभाजीनगर एसटी स्टँड परिसरात कारंजकर हाॅस्पिटलच्या दारात व देवकर पाणंद चौकातील केएमटी बसथांब्यावरच लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फ्लेक्स लावून बसथांबा पूर्णपणे झाकला होता, त्यामुळे प्रवाशांना बसथांब्याच्या बाहेर ऊन्हात उभे रहावे लागत होते, अशा बेकायदेशीर गोष्टींना लोकप्रतिनिधींनी आळा घातला पाहिजे,

मात्र महापालिकेच्या प्रशासनाने सुध्दा या बेकायदेशीर फ्लेक्स कडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलेचे निदर्शनास आले, काही राजकीय नेत्यांनी आपल्या वाढदिवसांचे बोर्ड, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स लावू नका म्हटल्यानतरसुद्धा उलट या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी मोठे फ्लेक्स लावलेले दिसले. यामुळे महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

महापालिकेच्या प्रशासनाने तक्रारी आल्यानंतर तेवढ्यापुरते कारवाई केल्याचे नाटक करायचे आणि पहिला पाढा पुन्हा सुरू करायचा असा प्रकार सर्रास सुरू आहे. जाहिराती केल्याशिवाय प्रसिध्दी होत नाही मग कोणीही उठावे होर्डिंग्ज, बोर्ड, फ्लेक्स उभारावेत यासाठी थोडी चिरीमिरी दिली की सर्व वातावरण शांत होते, सर्वसामान्य नागरिक रोज उठून कशाला तक्रारी करेल. त्याला पोटापाण्याची चिंता असते. त्यामुळे महापालीकेच्या प्रशासनानेच कायदा हातात घेणाऱ्या या प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes