SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा : मिथिलेश पांडे; सराफ संघाची कार्यशाळा उत्साहातडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषदजागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे : खासदार धनंजय महाडिकदूरशिक्षण केंद्राच्या एम.बी.ए.मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवडशिवाजी विद्यापीठात जमणार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्रज्ञांची मांदियाळी; तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभकागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूराज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या; मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावामनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागतविकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद; डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शनआषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जाहिरात

जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु : मंगलप्रभात लोढा; जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

schedule01 Jun 25 person by visibility 387 categoryराज्य

मुंबई : जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबईशहरातील मल्होत्रा हाऊस इमारतीत जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते तर अध्यक्षा आभा सिंह यांच्या उपस्थितीत झाले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जैन समाजाच्या विकास व उत्थानासाठी शासन कटीबद्ध आहे. महामंडळाच्या सुयोग्य व प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल.

 महामंडळाचे अध्यक्ष  ललित गांधी यांनी महामंडळाचे कार्य विषद केले. त्यांनी 26 जिल्ह्यांचा दौरा करत 22 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. या दौऱ्यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, अध्यक्षा आभा राणी सिंह यांनी सांगितले.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes