कोल्हापुरात स्वर्गीय राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
schedule02 Jun 25 person by visibility 257 categoryसामाजिक

कोल्हापूर : स्वर्गीय ग्रेट शो मॅन राज कपूर यांच्या ३७व्या स्मृती दिनानिमित्त राजकापूर स्मारक जुना वाशी नाका येथे कलासक्त स्टेडिओ ग्रुपच्या वतीने प्रमुख पाहुणे अर्जुन नलवडे व सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कलासक्तचे दिनकर साळोखे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली १४ जून रोजी सकाळी ११वाजता राजर्षी शाहू स्मारक, भवन येथे कपूर परिवारातील नायक, नायिका यांच्यावर आधारित चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार असून करवीरकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर प्रमुख पाहुणे अर्जुन नलवडे यांनी राजकापूर यांना भालाजी पेंढारकर यांनी चित्रपटात नारदाची भूमिका देऊन संधी दिली त्याचे संपूर्ण भारतातील पहिले स्मारक स्व. संभाजी पाटील यांनी कोल्हापुरातील जुना वाशी नाका येथे उभारले करवीरकरांचा हा ऋणानुबंध सतत कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ३७ डझन केळी वाटप करण्यात आले नीलिमा काळे यांनी आभार मानले.
यावेळी राजन कारंजकर, मोहन लोंढे, अमित पाटील, मनोज सुतार, सचिन. जाधव, डॉ. उदयकुमार भट, वैशाली केसरकर, सुनीता कोकाटे, अमृता गलांडे, उदय निगडे यासंह हौशी गायक, कलाकार, नागरिक उपस्थित होते.