SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा 2025 मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे घवघवीत यशमहाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पुर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट उघडकीसमहानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला भेटडोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराची गंभीर दखल‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभाग मार्फत अंतर विभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजनउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चौघे जखमीअजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चौघे जखमीताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

जाहिरात

 

केंद्रीय सहकार मंत्रालयांतर्गत संयुक्त समितीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश

schedule22 Dec 22 person by visibility 2429 categoryदेश

नवी दिल्ली : संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नामदार अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या कायद्यात काही सुधारणा करणे कालपरत्वे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील निवडक खासदारांची एक संयुक्त समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजेच बहुराज्य सहकारी कायद्यांमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या, कोणते बदल करायचे, याबाबत ही संयुक्त समिती एक अहवाल तयार करेल आणि तो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करेल. संपूर्ण देशभरातील सहकार चळवळीसाठी हे विधेयक अत्यंत महत्वाचे आहे. 

विधेयकात बदल आणि दुरूस्ती सुचवण्याच्या समितीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग झाल्याने, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes