टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, शुभमन गिल बाहेर, इशान किशनची एन्ट्री
schedule20 Dec 25 person by visibility 108 categoryक्रीडा
नवी दिल्ली : टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२६: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा शनिवार, २० डिसेंबर रोजी करण्यात आली. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर खराब फॉर्ममुळे झगडत असलेला शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, हर्षित राणा आणि इशान किशन (यष्टिरक्षक).
विशेष म्हणजे टीम इंडिया आपले ग्रुप सामने चार वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळेल. भारतीय संघाचे ग्रुप सामने अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली), वानखेडे स्टेडियम (मुंबई), आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो) आणि नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) येथे होतील.





