SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापुरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक

schedule29 Aug 25 person by visibility 771 categoryगुन्हे

कोल्हापूर : मोका गुन्हयातील जामीनावर आलेल्या, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने ही कारवाई केली.

 27 ऑगस्ट रोजी गणेश आगमन मिरवणुकी दरम्यान आसु बादशहा शेख रा दौलतनगर कोल्हापूर याच्यावर  पोलीस रेकॉर्डवरील व मोका सारख्या गुन्हयातुन जामीनावर बाहेर आलेल्या शुभम अजित हळदकर या आरोपीने खुनी हल्ला करुन त्यास गंभीर जखमी केले होते.  याबाबत राजारामपुरी पोलीस ठाणेस गुन्हा  दाखल करणेत आलेला होता.

तपास पथकाने कदंलगाव येथे  सापळा रचुन आरोपी शुभम अजित हळदकर वय 26 रा. दौलतनगर कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर आरोपी शुभम हळदकर यास ताब्यात घेवुन राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर करणेत आले आहे, पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत आहे. आरोपी शुभम अजित हळदकर याचेवर  मोका सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार , व  अपर पोलीस अधीक्षक , डॉ. बी. धीरजकुमार सतो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक  संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, अरविंद पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes