SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"दहा वर्षांत पक्षात आलेल्यांना पदे, मग ४० वर्षांच्या निष्ठेचं काय?" : आमदार राजेश क्षीरसागर यांचा सवालयेणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवाभाऊंना ठाण्यामध्ये शोधावे लागेलधरणगुत्ती, हरोली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरतालीम संस्था केवळ शरीर कमावण्याची फॅक्टरी नव्हे तर सुसंस्कृत बनण्याचे विद्यापीठ, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहनसंविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात डॉ. संबोधी देशपांडे यांचे विशेष व्याख्यानमराठी नाट्यसृष्टीच्या आद्य कर्तृत्ववान शिल्पकार: हिराबाई पेडणेकरगोकुळ दूध संघामार्फत म्हशीच्या दुधाला ३ रुपये आणि गाईच्या दुधाला २ रुपये दरवाढ दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी मानले संचालकांचे आभारबेसमेंटमधील पाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्याप्रकरणी वरद डेव्हलपर्सला १० हजारांचा दंडउंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहात

जाहिरात

 

"दहा वर्षांत पक्षात आलेल्यांना पदे, मग ४० वर्षांच्या निष्ठेचं काय?" : आमदार राजेश क्षीरसागर यांचा सवाल

schedule22 Nov 26 person by visibility 49 categoryराजकीय

कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा पाढा वाचत, पक्षवाढीसाठी आपण केलेल्या त्यागाचा आणि निष्ठेचा आता तरी विचार व्हावा, अशी आक्रमक भूमिका मांडली आहे,. "पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक मंत्री गेल्या दहा वर्षांत पक्षात आले आहेत, मी मात्र ४० वर्षे पक्षासाठी झिजलोय. आता मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,
कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना आमदार क्षीरसागर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील विविध टप्पे उलगडले.

 एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला आर्थिक लाभापेक्षा जबाबदारीचे पद मिळावे अशी अपेक्षा असते, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

स्वतःचा उल्लेख 'शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक' असा करत क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर हे राज्यात शिवसेनेचे समीकरण बनले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे,. नेत्यांनी आदेश देण्याची वाट न पाहता, त्यांच्या मनातील ओळखून कोणते आंदोलन करायचे, कोणती सामाजिक कामे हाती घ्यायची आणि विकासकामांवर कसा भर द्यायचा, हे आपण ४० वर्षे सातत्याने केले असल्याचे त्यांनी सांगितले,

२०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. सत्तेत सहभागी असूनही पक्षाकडून आलेल्या आदेशांचे पालन करत आपण वेळोवेळी सरकारविरोधी भूमिका घेतली आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला,. पक्षासाठी आपण कधीही कोणतीही तडजोड केली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनावेळी खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या विधानाची आठवण करून देत क्षीरसागर म्हणाले की, "या व्यासपीठावर बसलेल्यांमध्ये एकमेव खऱ्या अर्थाने शिवसैनिक राजेश क्षीरसागर आहेत, असे खासदार माने यांनी स्पष्टपणे सांगितले होते,." २०२२ मध्ये शिवसेनेवर मोठा फुटीचा प्रसंग उद्भवल्यानंतर आपण शिवसैनिकांना बळ दिले आणि संघटना एकसंध ठेवण्याचे काम केले,.

पश्चिम महाराष्ट्रात आपण सर्वात ज्येष्ठ आहोत. इतरांच्या क्षमतेबद्दल किंवा त्यांना दिलेल्या शब्दाबद्दल आपले कोणतेही दुमत नाही, मात्र ४० वर्षांच्या तपश्चर्येनंतर आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे,. संघटनात्मक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली असून, राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात फिरताना कार्यकर्त्यांचे प्रचंड पाठबळ मिळत आहे,. त्यामुळे आता राज्यासाठी काम करण्याची एक चांगली संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त करत पक्षनेतृत्व ती संधी नक्की उपलब्ध करून देईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला,

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes