SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धरणगुत्ती, हरोली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरतालीम संस्था केवळ शरीर कमावण्याची फॅक्टरी नव्हे तर सुसंस्कृत बनण्याचे विद्यापीठ, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहनसंविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात डॉ. संबोधी देशपांडे यांचे विशेष व्याख्यानमराठी नाट्यसृष्टीच्या आद्य कर्तृत्ववान शिल्पकार: हिराबाई पेडणेकरगोकुळ दूध संघामार्फत म्हशीच्या दुधाला ३ रुपये आणि गाईच्या दुधाला २ रुपये दरवाढ दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी मानले संचालकांचे आभारबेसमेंटमधील पाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्याप्रकरणी वरद डेव्हलपर्सला १० हजारांचा दंडउंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातकार्तिक शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदान

जाहिरात

 

धरणगुत्ती, हरोली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

schedule22 Nov 26 person by visibility 78 categoryराज्य

◼️दोन्ही गावात २ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ 

धरणगुत्ती : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. धरणगुत्ती आणि हरोली गावांच्या विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू देणार नाही. गावांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासाची कामे सातत्याने सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

धरणगुत्ती येथे एकूण १ कोटी ५ लाख रुपये, तर हरोली येथे ९५ लाख रुपये अशा एकूण २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

धरणगुत्ती येथे ६० लाख रुपये निधीतून चार ठिकाणी काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच खंडोबा मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपये, जयसिंगपूर-धरणगुत्ती रस्त्यासाठी २५ लाख रुपये आणि तलाठी कार्यालयासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना शहराप्रमाणे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. रस्ते, धार्मिक स्थळांचा विकास, शासकीय कार्यालयांच्या सुविधा आणि गावातील पायाभूत विकासकामे यांना प्राधान्य दिले जात आहे. धरणगुत्ती गावाने दाखविलेल्या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून यापुढेही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

 विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण गावाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रचीता कोळी, संजय पाटील, बाबासो पाटील, शिवाजीराव शिंदे, संजय शंकर पाटील, अण्णासो पाटील, संजय दत्तात्रय पाटील, विस्तार अधिकारी चंद्रकांत केंबळे, विराज टोण्णे, राजू गवळी, राजू बाबा पाटील, प्रवीण तोडकर, दरिबा कांबळे, सचिन मोरे, साळवी, अनिल आवटी, संजीव गुरव, शिवाजी जाधव, महादेव कांबळे, रावसाहेब कांबळे, मिलिंद खांडेकर, संजय कोळी, संभाजी जाधव, संजय कोरे, अशगकर शेख, किरण कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले.

दरम्यान, हरोली येथेही विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मराठा भवन उभारणीसाठी २५ लाख रुपये निधीतून पायाभरणी, विश्वकर्मा पांचाळ सुतार भवनासाठी २० लाख रुपये निधीतून पायाभरणी, तर ५० लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या बौद्ध समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. अशा एकूण ९५ लाख रुपयांच्या विकासकामांना यावेळी प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रतिता कोळी, नेमिनाथ चौगुले, सुनील पाटील, रामगोंडा पाटील, कांतिनाथ ऐनापुरे, भाऊसो पाटील, भाऊसो चौगुले, राजकुमार कांबळे, रोहित कांबळे, अण्णासो सुतार, संग्राम भोसले, रामदास सुतार, रुपेश कांबळे, विशांत कांबळे, प्रज्वल कांबळे, अमोल सुतार, मारुती साळुंखे, पांडुरंग कदम, प्रशांत चौगुले, कीर्तीकुमार पाटील, राजगोंडा पाटील, विजय चौगुले, मनोज चौगुले, स्वप्निल पाटील, राजू परीट, अभिजीत ऐनापुरे, स्वप्निल पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes