SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह: विज्ञानाचा खरा अर्थ मानवी कल्याणासाठीशिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखतपंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहितीदुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्राचे विशेष पॅकेज द्या; खासदार धनंजय महाडिक यांची अमित शहा यांच्याकडे मागणी१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मानराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या 'केआयटी'चा डंका; आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार पटकावलेविद्यापीठाचे सुरक्षा रक्षक शिवाजी शिंदे यांना शोल्डर स्टारमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादन

जाहिरात

 

राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना

schedule15 Nov 26 person by visibility 55 categoryराज्य

राजापूर : राजापूर बंधाऱ्यातील २१ बरगे चोरीला गेल्याच्या घटनेची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वायरलेस सीसीटीव्ही यंत्रणा बसवून बंधाऱ्यावर कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये आणि बरगे चोरणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

राजापूर येथील बंधाऱ्यातील २१ बरगे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. बंधाऱ्यावरील बरगे चोरीला गेल्याने पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांनी बंधाऱ्याला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

 यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.
बंधाऱ्याची सुरक्षितता लक्षात घेता येथे वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच बंधाऱ्यावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नियमित देखरेख ठेवण्यात यावी. यामुळे भविष्यात चोरीच्या घटना रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
सध्या शिरोळ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्यातील बरग्यांच्या चोरीमुळे पाणीपुरवठा आणि पाणी व्यवस्थापनावर परिणाम होऊ नये. तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची पाटबंधारे विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान, या चोरीच्या घटनेतील संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना आमदार यड्रावकर यांनी पोलिसांना दिल्या. बंधाऱ्याची सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes