SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरखुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा : मंत्री प्रकाश आबिटकरमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णयआरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची : हसमत हवेरी42 हजार विद्यार्थ्यांसाठी 59 टन पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटपशहर वाहतूक नियोजनासाठी महापालिका-शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक संपन्नवारणा विद्यापीठ व टेकडिफेन्स लॅब, गुजरात यांच्यात सामंजस्य करारडॉ. झाकीर हुसेन: भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपतीअनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्रसैनिकी मुलांच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पद भरती

जाहिरात

 

बंद प्रकल्पांना गती देण्यासाठी महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांची पाहणी; विविध ठिकाणी विकास आराखडे सादर करण्याच्या सूचना

schedule09 May 26 person by visibility 245 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील महापालिकेचे बंद पडलेले तसेच वापरात न आलेले विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापौर  रूपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी आज संयुक्त पाहणी केली. यावेळी विविध प्रकल्पांची सद्यस्थिती तपासून तातडीने आराखडे सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यात टेंबलाईवाडी येथील आयआरबीकडून उभारण्यात आलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल इमारतीची पाहणी करण्यात आली. सदर इमारत उत्कृष्ट दर्जाची असून ती वापरात येणे आवश्यक असल्याचे सांगत, नामांकित हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क साधून पुढील आठवड्यात प्रेझेंटेशन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून इमारत भाडे तत्वावर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

यानंतर टाकाळा येथील लँडफिल साईटची पाहणी करण्यात आली. ही जागा व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने येथे इनर्ट मटेरियल न टाकता जागेचा विकास करून कमर्शियल प्रकल्प उभारण्याबाबत आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले.

तसेच हॉकी स्टेडियम समोरील विकसकाकडून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या इमारतीचीही पाहणी करण्यात आली. इमारत तयार असून वापरात नसल्याने संबंधित विकसकाची सुनावणी घेऊन तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. इमारत सुस्थितीत महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर ती भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशा सूचना केल्या.

यानंतर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन मानधन तत्त्वावर डॉक्टर नेमणुकीबाबत प्रस्ताव सादर करावा. रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर व आयुक्तांनी स्पष्ट केले.

सदर हॉस्पिटलची विद्यमान इमारत निष्कासित करून नव्याने उभारण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
शेवटी पंचगंगा स्मशानभूमी येथे भेट देऊन सीएसआरच्या माध्यमातून अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. इच्छुक संस्था व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जावडेकर, उपशहरचनाकार एन. एस. पाटील, उपशहर अभियंता अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंखे, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील व कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes