SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
42 हजार विद्यार्थ्यांसाठी 59 टन पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटपशहर वाहतूक नियोजनासाठी महापालिका-शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक संपन्नवारणा विद्यापीठ व टेकडिफेन्स लॅब, गुजरात यांच्यात सामंजस्य करारडॉ. झाकीर हुसेन: भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपतीअनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्रसैनिकी मुलांच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पद भरतीनिपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईकोल्हापुरात शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का? 'आप'चा आयुक्तांच्या बैठकीत सवालकेएमटीचा कायापालट होणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीसह महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जाहिरात

 

42 हजार विद्यार्थ्यांसाठी 59 टन पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटप

schedule13 May 26 person by visibility 72 categoryशैक्षणिक

  कोल्हापूर : डॉ. राजेंद्र भारुड यांच्या पुढाकारातून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, त्याअंतर्गत शहरातील 188 शाळांमधील सुमारे 42 हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांची उचल करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने विभागीय पाठ्यपुस्तक भांडार, बालभारती शिरोली येथून पाठ्यपुस्तकांची उचल करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ भांडार व्यवस्थापक रविंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

     शालेय जीवनात पाठयपुस्तकांचे महत्व अनन्य साधारण असून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ करण्यात पाठयपुस्तकांचे योगदान मोलाचे असते. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. शहरातील सुमारे 42 हजार विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. यासाठी एकूण 2 लाख 49 हजार 36 प्रतींची आवश्यकता असून त्यांचे वजन जवळपास 59 टन इतके आहे. शाळानिहाय, माध्यमनिहाय व इयत्तानिहाय वर्गीकरण करून गवत मंडई येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथे पुस्तकांचा सुरक्षित साठा करण्यात आला आहे. शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पोहोचावीत, यासाठी वितरणाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस किंवा वाहतुकीदरम्यान नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.

      यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, शहर समन्वयक राजेंद्र आपुगडे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, डी. वाय. पाटील संस्थेकडील विश्वास केसरकर, अधिक्षक सचिन जाधव, जालिंदर गायकवाड, सागर गायकवाड, निर्मिती अधिकारी मनिष निघोट, अविनाश लाड, राजू गेंजगे, शांताराम सुतार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes