SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारणा विद्यापीठ व टेकडिफेन्स लॅब, गुजरात यांच्यात सामंजस्य करारडॉ. झाकीर हुसेन: भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपतीअनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्रसैनिकी मुलांच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पद भरतीनिपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईकोल्हापुरात शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का? 'आप'चा आयुक्तांच्या बैठकीत सवालकेएमटीचा कायापालट होणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीसह महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल; 'एफएफपीओ'च्या माध्यमातून ५००० कुटुंबांना मिळणार रोजगारकंत्राटदार नोंदणीस 15 मे पर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

वारणा विद्यापीठ व टेकडिफेन्स लॅब, गुजरात यांच्यात सामंजस्य करार

schedule13 May 26 person by visibility 136 categoryशैक्षणिक

◼️सायबर सुरक्षा व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन आणि कौशल्यविकासाला चालना

वारणानगर : वारणा विद्यापीठ, वारणानगर आणि टेकडिफेन्स लॅब (TechD Cybersecurity Limited), अहमदाबाद, गुजरात यांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व सायबर सुरक्षा क्षेत्रातील संशोधन, कौशल्यविकास, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारावेळी, सनी वाघेला, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टेकडिफेन्स लॅब्स, वारणा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही. कारजिन्नी तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून सायबर सिक्युरिटी व कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम विभागाचे विभागप्रमुख डॉ. सौरभ बोरचाटे उपस्थित होते.

सध्या सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हल्ले, अत्याधुनिक फिशिंग मोहिमा, रॅन्समवेअर आक्रमणे, डीपफेक फसवणूक, सप्लाय चेनवरील हल्ले तसेच अंतर्गत सुरक्षाविषयक धोके मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विशेषतः महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा व संवेदनशील माहितीवर होणारे सायबर हल्ले जागतिक स्तरावर गंभीर आव्हान बनले आहेत.

यावेळी, वारणा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे, सदस्य व शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांनी सांगितले की, सायबर सुरक्षा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अत्यंत आवश्यक बनले आहे.

 टेकडिफेन्स लॅबसारख्या अग्रगण्य संस्थांसोबतचे सहकार्य विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना आधुनिक सायबर सुरक्षा तंत्रज्ञान, AI आधारित संरक्षण प्रणाली आणि थ्रेट मिटिगेशन कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या सामंजस्य कराराद्वारे संशोधन, कौशल्य विकास, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, अभ्यासक्रम बनवण्यासाठी सहकार्य, प्राध्यापक प्रशिक्षण, प्राध्यापक विकास कार्यक्रम, प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेस चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्ये, प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि नवोपक्रमाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या करारासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील तसेच कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे तसेच प्राध्यापक व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

या करारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना भविष्यातील डिजिटल आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्याधुनिक सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रशिक्षण मिळून सायबर क्षेत्रात नवी दिशा प्राप्त होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes